विवाह समयी पहावी ती आकाशी तारका
सुगंधित तेजस्वी तारयासम मिळता तो सखा
तेजपुंज उल्का जन्मली दिपली ग अवनी
संसाराची वेल फुलवी अरुंधती सौरभ
कळी उमलली ह्या वेलीवर बहरले वैभव
मन गेले मोहरूनी आनंदे नाहुनी
अखंडित राहो तुजवरी अंबेची ग कृपा
मागणे हे हेचि करितो नरसिंह रे नृपा
सिद्धीविनायका होवो कन्या हि सुगुणी
नभातुनी आली घरी एक परी पाहुणी
पाळण्यात जोजवा ग अंगाई गाउनी
---प्रसाद
No comments:
Post a Comment