तो: चंदेरी रात प्रिये तुझी साथ
प्रीतीची ग बरसात साजणी
प्रीतीची ग बरसात
ती: चंदेरी रात प्रिया तुझी साथ
प्रीतीची रे बरसात साजणा
प्रीतीची रे बरसात
तो: चांदाच्या किरणावारी झुलव शृंगाराचा तू झुला
ती: स्वच्छंदी भ्रमरापरी फुलव हलके हलके तू मला
घेशी चुंबने अगणित जितक्या चांदण्या रे गगनात
सखया प्रीतीची रे बरसात
तो: डोंगर कपारीत वाहती खळखळ प्रणयाचे झरे
ती: नाद हा जरी एकांती होई मन माझे रे लाजरे
झुकती खाली पापण्या धरता मधुघट तू अधरात
सखया प्रीतीची रे बरसात
ती: बाहुपाशात तुझ्या तनुवरी रोमांचाची नर्तने
नाचे यौवन मयुरी होती मिलनाची आवर्तने
तो: अशीच रजनी बहरेल जोवरी तृप्ती दिसे नयनात
सखये प्रीतीची ग बरसात
---प्रसाद शुक्ल
No comments:
Post a Comment